Posts

महाभारत...एक दीपस्तंभ

राग, लोभ, इर्षा, असूया, निती, अनिती, कपट, माया, आस्था, त्याग, प्रेम,मोह, काम, विकार, या आणि अश्या असंख्य भावभावनांचा कल्लोळ म्हणजे महाभारत. विचारांचे अनेक पैलू समोर येत असतानाच धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय, चांगले काय, वाईट काय, असे अनेक प्रश्न पडत राहतात आणि त्यांची उकल पण होत राहते. अनादी काळापासून असलेले हे कालातीत चित्र  आहे, ज्यावर असंख्य रंग छटा उमटत आहेत..  विचारांचा ,भावनांचा गुंता , त्यातील घालमेल, मानस शास्त्र उकलत जाणारी ही विचारधारा अनंत अंगाने समोर प्रकट होते. विविध कंगोरे नजरेसमोरून जातात आणि येतात, कसोटीचे क्षण येतात. महात्मे म्हणून समोर येणारी व्यक्तिमत्वे काहीवेळा अगदी सर्व सामान्य माणसाच्या वैचारिक पातळीवर येऊन अगदी हीन कृती करताना आढळतात. उत्तुंग गिरी शिखरे पादाक्रांत करता करता अचानक स्वतःला खोल खोल गर्तेत झोकून टाकताना दिसतात.. मग प्रश्न पडतो, यातील खरा कोण.. निती ने वागणारा मगाचा असामान्य मानव का अनीतीच्या कचऱ्यात स्वतःला हरवणारा एक अतिसूक्ष्म जीव. माणूस म्हणून पाहिले की जाणवते..ही तर आपल्या सारखी हाडा मांसाची माणसे. दैव- कर्म याची सांगड घाल...

साद जाणिवेची

घटना तशी  साधीच ...वेळ संध्याकाळची. स्वानंदला म्हणजे माझ्या मुलाला फुटबॉल क्लासला सोडायला चाललो होतो... सातवीत आहे तो. फुटबॉलला सोडणे ही एवढी एक गोष्ट की जिथे, तो माझ्या कडून करून घेतो... फुटबॉल मनापासून आवडतो त्याला.. लिफ्टमध्ये बसलो अकराव्या मजल्यावर . स्वानंद माझ्या बरोबर काहीतरी मस्ती करत होता.. नवव्या मजल्यावर आमच्या सोसायटी मधीलच एक कॉलेज कुमार आला. कानात इअर फोन, हातात दोन मोबाईल आणि एक पॉवर बँक. सहाव्या मजल्यावर लिफ्ट थांबली.. समोर एक आजी..हातात काठी.वय साधारण 70 वर्षे. आजींना बघताच , क्षणातच, स्वानंद  स्वतःहून पुढे आला लिफ्ट चा दरवाजा धरण्यासाठी..it was his sponatinous action. स्वयं प्रेरेणे तो पुढे आला.. त्यावेळी तो मुलगा मात्र आपल्या मोबाईल मध्ये गुंग. लिफ्ट बेसमेंट ला आली.. स्वानंद ने परत पुढे होऊन लिफ्ट ओपनिंग चे बटण दाबून ठेवले. त्या आजींना लिफ्ट मधून बाहेर पडण्यास मदत केली. त्यावेळी पण तो मुलगा आपल्या मोबाईल मध्ये गुंग. त्या क्षणाचा अभिमान वाटला. रोपट्या ला खत पाणी चांगले घातले तर, रोप चांगल्या प्रकारे वाढण्याची खात्री वाढते. माहित नाही, अजून लहान ...