साद जाणिवेची

घटना तशी  साधीच ...वेळ संध्याकाळची. स्वानंदला म्हणजे माझ्या मुलाला फुटबॉल क्लासला सोडायला चाललो होतो... सातवीत आहे तो. फुटबॉलला सोडणे ही एवढी एक गोष्ट की जिथे, तो माझ्या कडून करून घेतो... फुटबॉल मनापासून आवडतो त्याला..

लिफ्टमध्ये बसलो अकराव्या मजल्यावर . स्वानंद माझ्या बरोबर काहीतरी मस्ती करत होता..
नवव्या मजल्यावर आमच्या सोसायटी मधीलच एक कॉलेज कुमार आला. कानात इअर फोन, हातात दोन मोबाईल आणि एक पॉवर बँक.

सहाव्या मजल्यावर लिफ्ट थांबली.. समोर एक आजी..हातात काठी.वय साधारण 70 वर्षे.

आजींना बघताच , क्षणातच, स्वानंद  स्वतःहून पुढे आला लिफ्ट चा दरवाजा धरण्यासाठी..it was his sponatinous action. स्वयं प्रेरेणे तो पुढे आला.. त्यावेळी तो मुलगा मात्र आपल्या मोबाईल मध्ये गुंग.

लिफ्ट बेसमेंट ला आली.. स्वानंद ने परत पुढे होऊन लिफ्ट ओपनिंग चे बटण दाबून ठेवले. त्या आजींना लिफ्ट मधून बाहेर पडण्यास मदत केली. त्यावेळी पण तो मुलगा आपल्या मोबाईल मध्ये गुंग.

त्या क्षणाचा अभिमान वाटला. रोपट्या ला खत पाणी चांगले घातले तर, रोप चांगल्या प्रकारे वाढण्याची खात्री वाढते.

माहित नाही, अजून लहान आहे म्हणून म्हणा किंवा मोबाईल नावाच्या वेताळ पासून तो दूर आहे म्हणून म्हणा, तो सजग होता..

हा सजग पणा माझ्या चिरंजीवामध्ये सतत चिरंजीव रहावा

जाणीवेचे स्फुल्लिंग सतत चेतवत ठेवावे...ते तर तुमच्या आमच्या जगण्याचे प्रतीक व्हावे,
 होय, की नाही...?

Comments

  1. डिजिटलायझेशन मुळे येणारी स्वमग्नता हा मोठा विकार काही दिवसांनी होईल , त्यासाठी वरवरचे , प्रदर्शन करणारे नव्हे तर आत पक्के मुरलेले संस्कारच उपयोगी पडतील असं वाटतं. तुमच्या संस्कारामुळे , समाजाचे देणे दोन्ही हातानी आई बाबा परत करत असलेले प्रत्यक्ष वागण्यातून तो बघत आहे, त्यामुळे स्वानंदची संवेदनशीलता अशीच कायम राहील, यात शंका नाही .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

महाभारत...एक दीपस्तंभ